लेखक: अनु बंदोपाध्याय वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------
लहानं मुलांसाठी "बापूजींची ओळख" या रूपात लिहिलेले हे पुस्तक मोठ्यांनाही नक्की आवडेल, असे पं. नेहरू त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, ते खरेच आहे. गांधीजी त्यांना ज्या ज्या गोष्टीत रस वाटेल तिचा अगदी खोलात शिरून अभ्यास करून ती आत्मसात करून घेत असत, जणू ते ती भूमिका पूर्ण पणे आत्मसात करून घेत. या पुस्तकात गांधीजींच्या राजकारणी आणि नेता या भूमिकेवर भर न देता दैनंदिन जीवनातील त्यांच्या रूपावर भर दिलेला आहे.
-----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment