वाचक: मिलिंद गव्हाणकर
-----------------------------------------------------------------------------------
मूळ संस्कृत भाषेत असलेले पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णु शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्र भेद, मित्र सम्प्रप्ति, काकोलूकीयम, लब्धप्रणाशम आणि अपरीक्षितकारम असे पाच भाग असून यात पशु-पक्षांच्या रुपाकातून माणसाला व्यवहार चातुर्य सांगितले आहे.
एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा महिलारोप्य वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी राजा होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख, व्यवहार शून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहार कुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा त्याने उचलला. विष्णु शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र. पंचतंत्र हि एक नीतिकथा आहे. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धुर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे.
-----------------------------------------------------------------------------------
Farach chan ahe panchatantra.
ReplyDeleteMe lahan asatana , ase original pustak amachya kade hote.
Ata kuthe milu shakel hyachi prat kahi sangu shakal ka.
And tumacha bolki pustake ha upakram farach chan ahe.
Arebian nights pan asel tar tyache pan vachan aikayala awadel.
शैलेश विश्वासे -
ReplyDeleteखूपच छान उपक्रम, मी मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेछ्या देतो, वेगवेगळ्या विषयांवर अशीच बोलती पुस्तके काढाल हि अपेक्षा,
मी पण अशीच बोलती पुस्तके करण्यास उत्सुक आहे. मी आपल्या मदतीला आल्यास खूप आनंद होईल .
-shailesh.v88@gmail.com
अतिशय स्त्युत्य उपक्रम आहे. प्रत्येकाने ऐकावे असे आहे.
ReplyDelete