बोलतं पुस्तक: तुमच्या आवाजात!

तुम्हाला हा उपक्रम आवडला आणि त्याला हातभार लावावासा वाटला तर तुम्हीही तुमचं एखादं आवडतं पुस्तक बोलत्या माध्यमात, तुमच्या स्वत:च्या आवाजात ध्वनीमुद्रित करु शकता. आम्हाला ते इथे प्रसिद्ध करायला फार आवडेल. आणि ही गोष्ट वाटते तितकी अवघडही नाही. एक कॉम्प्युटर, एक "हेडसेट" (माईक आणि इयरफोन सहित), थोडा फावला वेळ आणि खूप उत्साह असला की झालं!

कोणतं पुस्तक तुम्ही वाचू शकता हे जाणण्यासाठी कृपया "जुनी पुस्तकेच का?" हा लेख पहा.

असं एखादं जुनं पुस्तक सध्या हाताशी नसेल तर खालील साईट्स वर अनेक जुनी मराठी पुस्तके scan करून
ठेवलेली आहेत, त्यात एखादं मनाजोगतं पुस्तक दिसतं का ते पहा:

Osmania University Scanned Books

http://www.sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc_Feb2013.html

http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html

पुस्तक ध्वनीमुद्रित करण्यासाठी तुम्हाला ऑडॅसिटी हे मोफत मिळणारं आणि वापरायला अगदी सोपं software वापरता येईल.

अधिक माहितीसाठी किंवा तुम्ही पुस्तक वाचायचा विचार करताय हे कळवण्यासाठी कृपया तळात दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.

मग आता आणखी विचार कशाला? शुभस्य शीघ्रम!

धन्यवाद,

आनंद वर्तक.

5 comments:

vasekar_englishlab said...

Vartak ji
Namaskar....

Mala blind students sathi aaplya upakramacha khup upyog hot aahe.me aaplya la kahi madat karu shakat asel tar please sanga.me pan record karu shakto....pl....reply...
vasekar@gmail.com

Sanjay Sonar said...

Dear Vidyanand,
Got you message on Amhi numaviya. This is a good project & I would like to help. You can upload a story by Prakash Narayan Sant, recorded in the voice of my son. You can listen to it here...
http://sanjeevsonar.multiply.com/music/item/16/16

DATTOPANT said...

Dear Vartak ji
Namaskar ..
Aapla ha upkram pharach awadala. Bolka Pustak Tumchya Awajat ya la nakkich madat karayala awadel. I can share my time & sound for this definitely.
DP GOSAVI.
dattatraya.gosavi@gmail.com

Shyam said...

Namaste, Shri Anand Vartakji,

This is a wonderful idea and certainly would like to contribute. My charity organization, SHREE GANESHYAG PARIWAR (A registered Canadian Charity) has published a small book namely "Geeta for My Grandson" writer Shri Narayan B. Datar, Toronto. I will be personally interested to handle this project in consultation with you. Lookforward to your reply. Dhanyavad, Shyam Mathkar, Toronto.

Kalpana Patil said...

उत्तम उपक्रम !
याचा जास्तीत जास्त प्रसार आणि सहभाग यासाठी प्रयत्न करेन
शुभेच्छा !