लेखक: स्वा. वि. दा . सावरकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------
१९०७ च्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर लंडन मध्ये शिकत असताना त्यांनी १८५७ च्या
उठावाच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त साधून तेथील "इंडिया ऑफिस" येथील संग्रहातील
कागदपत्रांच्या अभ्यासातून हे पुस्तक लिहिले. या उठवला स्वातंत्र्यसमर असे संबोधन
सुद्धा त्यांनीच प्रचलित केले. हे पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी ब्रिटिश सरकारने
सर्व प्रयत्न केले. शेवटी ते नेदरलँड मध्ये गुप्त रीतीने छापून वेगळ्याच
पुस्तकाच्या
वेष्टनात घालून भारतात आणले गेले. त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली
होती ती स्वातंत्र्य मिळेपर्यंत लागू होती. असे हे पुस्तक स्वातंत्र्यपूर्व आणि
नंतरच्याही अनेक देशप्रेमींना प्रेरणा देत आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment