जुनी पुस्तकेच का?

सर्व बोलती पुस्तके ही जुनीच का आहेत, असा आपल्याला प्रश्न पडेल. त्याचं उत्तर असं आहे की बोलतं पुस्तक ही त्या मूळ पुस्तकाची नक्कल (कॉपी) मानण्यात येते, आणि त्यामुळे बोलत्या पुस्तकांना कॉपीराईट ऍक्ट लागू होतो. पुस्तकांचे हक्क सामान्यत: लेखक/लेखिकेच्या मृत्यूनंतर ६० वर्षे टिकतात आणि त्यानंतर ते लिखाण सार्वजनिक बनते. (पहा: भारतीय कॉपीराईट नियम पुस्तिका)

या नियमानुसार आम्ही येथे फक्त अशी सार्वजनिक पुनर्मुद्रणासाठी उपलब्ध असलेली पुस्तकेच बोलत्या माध्यमात आणली आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया तळाशी दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.

3 comments:

sachiyara said...

जुन्या आणि नव्याचा संगम हा नेहमीच आनंददायी असतो.
इथे तुम्ही चक्क जुनी मराठी पुस्तके आणि इंटरनेट एकत्र आणलंय.
खुपचं छान उपक्रम आहे.
धन्यवाद
सचिन

Anonymous said...

You are doing very great job. It will create interest. Keep it up. Please DON'T stop.

Thanks

प्रसाद said...

वा … शतशः धन्यवाद !
फार गरज आहे याची… आशा आहे की नियमितपणे यात भर पडत जाईल.
कॉपीराईटचा वर दिलेला नियम पाहता साने गुरुजी, सावरकर, नाथमाधव, ह. ना. आपटे, टिळक (लोकमान्य आणि रेव्हरंड दोघेही) यांचे सर्व साहित्य आता कॉपीराईट मुक्त असावे. ते टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिल्यास आम्हा वाचकांसाठी ती पर्वणीच ठरेल.